मनसे महिला आघाडीच्या वतीने पोलीस बांधवाना राखी बांधून केली राखीपौर्णिमा साजरी
स्थळ - येरवडा पोलिस ठाणे
मनसे महिला आघाडीच्या वतीने पोलीस बांधवाना राखी बांधून साजरी राखीपौर्णिमा साजरी केली.
बंदोबस्तावरील पोलिसांना सण साजरे करण्याचे प्रकार दुर्मिळच म्हणावे लागतील.पोलिस बांधव २४ तास समाजाचे रक्षण करतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना वडगावशेरी मतदार संघाच्या वतीने येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीसबांधवांना राखी बांधली. कार्यक्रमाचे आयोजन मनसे महिला विभाग अध्यक्षा दिपाली महेश शिर्के व उपविभाग अध्यक्ष महेश शिर्के यांनी केले होते. येथील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना, तसेच महिला पोलीस भागिनींना महिला कार्यकर्त्यांनी औक्षण करीत राखी बांधली. या उपक्रमामुळे पोलिसदेखील भारावून गेले. याप्रसंगी मनसे शहर सचिव रमेश जाधव यांनी महिला पोलीस भगिनीवर कविता सादर केली.प्रास्ताविक गणेश पाटील यांनी केले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम चक्रे, महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा गाताडे,अनिरुद्ध जायभाय,कैलास डुकरे, राजाभाऊ दीक्षित,सुजाता गायकवाड,सुजाता शिरसाठ,वर्षा सावंत, तसेच मनसेचे अर्चना माचरेकर, महिला शाखाध्यक्ष प्रीती मानकर लता ठाकूर, उषा पवार,शिला ठाकूर, रंजना दिवणे, शहर सचिव रमेश जाधव,विभाग अध्यक्ष सुनिल कदम, विभाग सचिव श्रीनिवास दिसले, कीर्ती माचरेकर, शुभम आल्हाट आदि पदाधिकारी उपस्थित होते.
फोटोओळ - येरवडा पोलीस ठाण्यातील पोलिस भगिनींना राख्या बांधताना मनसे कार्यकर्त्या
Read More