Slide 1 of 1 

निराधारांसाठी वृद्धाश्रमांची काळाची गरज- डॉ. नलिनी चौधरी
उंड्री, ता. 21 ः वृद्धाश्रम असू नयेत, ही बाब त्रिकालाबाधित सत्य आहे. प्रत्येक मुलांनी आपआपल्या माता-पित्याला सांभाळले, तर ही वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही. मात्र, ज्यांना कोणी वारसच नाही, अशा निराधारांसाठी वृद्धाश्रम काळाची गरज आहे, असे मत डॉ. नलिनी चौधरी यांनी व्यक्त केले.
वडकी (ता.हवेली) येथील गंगातारा वृद्धाश्रमामध्ये रोटरी क्लब ऑफ मगरपट्टा एलिटच्या वतीने तयार दिवाळी फराळ आणि दैनंदिन वस्तू दिल्या. याप्रसंगी डॉ. नीलम बनसोडे, अनिता शेंडे, गंगाताराच्या संस्थापक अध्यक्ष नीता भोसले, सचिव अॅड. लक्ष्मी माने उपस्थित होते. यावेळी निराधार माता-पित्यांनी आमच्या काळातील दिवाळीतील गाणी म्हणत उत्साह द्विगुणित केला, असे अध्यक्षा डॉ. नलिनी चौधरी यांनी सांगितले.
Tags:
3