Slide 1 of 1 

गुणवत्तावाढीसाठी पालक-शिक्षकांचा संवाद महत्त्वाचा
पुणे, ता. 21 ः रयत शिक्षण संस्थेने गुणवत्तवाढ उपक्रमाला विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि विकास होण्यासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद झाला पाहिजे, असे मत रयत शिक्षण संस्थेचे कोलवडी (ता. हवेली) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक डी.एच. चत्तर यांनी व्यक्त केले. कोलवडी (ता. हवेली) येथील लक्ष्मी गार्डन, चौफुला येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी माजी उपसरपंच पूनम पवार, दत्तात्रय रवळेकर, सोमनाथ पवार, सुभाष पवार, शीतल मांजरे, संतोष गायकवाड, संदीप रावळेकर यांच्यासह रवळेकरवस्ती, मुरकुटेवस्ती, भाडळेवस्ती, चौफुला, स्टार सिटी, पवारवस्ती परिसरातील उपस्थित होते.
Tags:
3