Slide 1 of 1 

सण-उत्सवातून महिलांच्या कलागुणांना वाव- डॉ. आदिती कराड
पुणे, ता. 21 ः सण-उत्सवाच्या माध्यमातून महिलांना एकत्रित आणून त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचा उपक्रम प्रेरणादायी आहे. त्यातून महिलांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती होत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे विश्वराज हॉस्पिटलच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. अदिती कराड यांनी सांगितले.
लोणी काळभोरमधील विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने नवरात्रोत्सवामध्ये महिलांसाठी प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये ऑक्सिजन व्हॅलि, कृष्ण ब्लेसिग, कुशल वाटिका, आनंद ग्राम व मॅजेस्टिक एक्वा या सोसायट्यांमधील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत खेळाचा आनंद लुटला. अंतिम स्पर्धेमध्ये कुशल वाटिका सोसायटीतील महिलांनी पैठणीचा मान मिळविला. तसेच सेमीफाइनलसाठी मॅजेस्टिक एक्वा ग्रुप मानकरी ठरला. दरम्यान, सर्व सोसायट्यांमधील महिलांची हेल्थ चेक करण्यात आले. आपलेपणाचे व आपुलकीचे नाते निर्माण करण्यासाठी विश्वराज हॉस्पिटलने एक पाऊल पुढे टाकून काम करण्याची भूमिका घेतल्याचा अभिमान वाटत असल्याचे महिलावर्गाने सांगितले.
डॉ. आशिषकुमार दोशी, किरण कुलकर्णी यांच्या पथकाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
Tags:
4
71 Views