Slide 1 of 1 

'' ...म्हणून बावनकुळेंना कुणीतरी रुग्णालयात दाखल करावं!''
- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला डिवचण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पाडायचं, 2024 ला महाविकास आघाडीला उमेदवार मिळणार नाही अशा शब्दात निशाणा साधला होता.
- आता याच टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील म्हणाल्या, चंद्रशेखर बावनकुळे यांना कोणीतरी तातडीने रुग्णालयात घेऊन जावं. त्यांना सातत्याने झटके येत आहेत. त्यांच्याकडून कधी राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पाडू तर कधी महाविकास आघाडीला उमेदवार मिळणार नाही यासारखी विधाने करताहेत हे झटक्याचे लक्षण आहे. त्यांच्यावर त्वरीत उपचार करणे गरजेचे आहे. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष या नात्याने सरकारसमोरील प्रश्नावर भाष्य केले पाहिजे असेही पाटील ठोंबरे म्हणाल्या.
Tags:
1
76 Views