५० हजारांची मागणाऱ्या महिला एपीआयसह दोघांवर गुन्हा
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
पुणे, ता. 21 : गुन्हयात दोषारोपत्रामध्ये मदत व गुन्हयातील आरोपींना अटक न करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कोंढवा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक महिला पोलीस निरीक्षकासह शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक हर्षदा बाळासाहेब दगडे आणि पोलीस शिपाई अभिजित विठठल पालके अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांवर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या दोषारोपोत्रात मदत करण्यासाठी; तसेच आई, वडील बहिणीला अटक न करण्यासाठी दोघांनी लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर अभिजित पालके याने ५० हजार रुपयांची लाच मागितली. त्याला हर्षदा दगडे यांनी सहाय्य केले, म्हणून दोघांवर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करीत आहेत.
Tags:
1