Slide 1 of 1 

महंमदवाडी- उंड्री-पिसोळी पारंपरिक पद्धतीने गोपूजन
उंड्री, ता. 21 ः महंमदवाडी, उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, होळकरवाडी परिसरातील शेतकरी कुटुंबांनी आज (शुक्रवार, दि. 21 ऑक्टोबर, 2022) पारंपरिक पद्धतीने गोपूजन केले. आजही उपनगरालगतच्या गावातील शेतकऱ्यांकडे गायी आहेत. गृहिणींसह चिमुकल्यांनीही दिन दिन दिवाळी, गायी ओवाळी असे म्हणत गोपूजन केले. भिंताडेनगर येथील रश्मी भिंताडे, शांता होले, रेणुका भिंताडे, रेखा कड, राणी बराटे, निर्मला होले, साधना कामठे, सुरेखा पुणेकर, शारदा कामठे, शुभांगी टकले यांनी गायीच्या गोठ्यामध्ये गोपूजन करून परंपरा जोपासली. परिसरातील महिलांनीही भल्या सकाळपासून गोपूजन करण्यासाठी वर्दळ केल्याचे भिंताडे यांनी सांगितले.
Tags:
1