Slide 1 of 1 

ओला दुष्काळ जाहीर करावा ; सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा ;साकत सोसायटीचे चेअरमन कैलास वराट यांची मागणी.
वसंत सानप |संपादक न्यूज स्वातंत्र्य, अहमदनगर
जामखेड तालुक्यात सर्वत्र अतिपाऊस झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.खरीपाची पीकं वाया गेली तर रब्बीची पेरणी होईल की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. ओल्या दुष्काळाच्या या संकटामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे शासनाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील नुकसान भरपाई म्हणून एकरी पंचवीस हजार तर रब्बीची पेरणी करता आली नाही याकरिता पंचवीस हजार अशी पन्नास हजारांची मदत द्यायला हवी, फळबाग, भाजीपाला,कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तर हेक्टरी दीड लाख रुपये मदत मिक्ळायला हवी, अशी मागणी साकत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन कैलास वराट यांनी केली आहे.
जामखेड तालुक्यात सर्वदूर अतिशय पाऊस झाल्यामुळे शेतीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. यावर्षी जोमात आलेली खरीपाची पीक पाऊसामुळे अक्षरशः:कोमात गेली. उडदाच्या काढणी वेळी पाऊसाने सुरुवात केली.त्यामुळे उडदाचे मोठे नुकसान झाले. उडीद भिजल्या मुळे त्याची पिवळी दाळ झाली. आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहिले. त्यामुळे ७५००/- पोहचलेला उडीद ३५००/- वर येऊन थांबला. व्यापार्यांनी सदर उडीद हा भिजल्याने निकृष्ट दर्जाचा असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या हाती कमी दर्जाचा शिक्षकांचं मारला. पाऊसाचा उघडपीचा काळ मिळताच जमेल तसा एकरी पाच ते साडेपाच हजार रुपये एकरी भाव काढणीला पैसे मोजून उडीद काढला. मळणी करिता क्विंटलला ६०० ते ७०० रुपये खर्च करुन मोठ्या आशेने बाजारा पर्यंत आणलेल्या उडदाचे मोठी निराशाच केली. शेतकऱ्यांच्या पदरी यंदाचा हे पीक कर्जाच्या बोजा मारुन गेलं.
पाऊसाने लहरीपणाचा कळस केला. यावर्षी सोयाबीन ला गोगलगायी चार मोठा प्रादुर्भाव झाला. त्यातून फवारणी, धुरळणी असे प्रकार करुन सोयाबीनची पीक काही शेतकऱ्यांनी वाचविली. त्यांना काढणीच्या वेळी निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटाका बसला. सततच्या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन दहा ते पंधरा दिवसांनी उशीरा पाऊसाचा उघडीपीचा हिशोब पाहून काढावे लागले.याकरिता एकरी साडे सहा हजारा पर्यंत मंजूरी मोजावी लागली. मात्र तोपर्यंत सोयाबीनची स्थिती हाताबाहेर गेली. शेंगा फुटणे, बुरशी लागणे, शेंगांची काढी कुजणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले. या संकटामुळे सोयाबीनचे पीकही हातचे गेले. काहींच्या पदरात खर्चाची लेवल होणार उत्पन्न पडलं. पीक पदरात पडेपर्यंत बाजारात सोयाबीन दर ढासळले. क्विंटल पाठीमागे ४५००/- हजारांचा भाव येऊन ठेपला.
तुरीच पीक उभे आहे मात्र अतिपाऊसामुळे त्यांची अवस्था ही दयनीय आहे.
त्यामुळे खरीपाच्या आधारावर रब्बीची पेरणी करण्याचं स्वप्न उराशी बाळगणारा बळीराजा मोठा अडचणीत सापडला आहे.त्याला या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनाच्या आधाराची गरज आहे.
*खरीप हातचा गेला आणि रब्बी लांबला*
जामखेड तालुका रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जातो. येथे मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी होते. यावर्षी मात्र तिफणीच्या चाढ्यावर अजून तरी शेतकरी मुठ धरु शकला नाही. यावर्षी ज्वारीची पेरणी अजून झाली नाही. तसेच होईल की नाही याबाबत संदिग्धता आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दोन्ही हंगाम अडचणी वाढविणारे ठरले आहेत. शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे.त्यामुळे सारसकट पंचनामे करून मदत करावी ; अशी मागणी साकत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन कैलास वराट यांनी केली आहे.