Slide 1 of 1 

सराईतांना अटक करून पिस्टल व चार काडतुसे केली जप्त
वानवडी पोलिसांची दमदार कामगिरी
पुणे, ता. 22 ः रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना वानवडी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून गावठी बनावटी पिस्टल व पाच काडतुसे जप्त केली. वानवडी पोलिसांनी दमदार कामगिरी केली.
ओकेभाई ऊर्फ ओमकार चंद्रशेखर कापरे (रा. संत गाडगेबाबा शाळेसमोर, लक्ष्मीनगर कोंढवा, पुणे), मनिष ऊर्फ आकाश मारुती झांबरे (रा. होळकरवाडी, उरुळी देवाची, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सराईत आरोपी हडपसरमध्ये येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली, त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना संशयावरून ताब्यात घेत गावठी पिस्टल व पाच काडतुसे जप्त केली.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे, वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले, अंमलदार संतोष तानवडे, अमजद पठाण, संतोष काळे, संतोष नाईक, अतुल गायकवाड, विनोद भंडलकर, महेश गाढवे, सर्फराज देशमुख, राहुल गोसावी, नीळकंठ राठोड, संदीप साळवे, अमोल गायकवाड, विष्णू सुतार, विठ्ठल चोरमले यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.