Slide 1 of 1 

कारवाई न झाल्यास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा !
पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर, ता.हवेली येथील पाटील वस्तीतील शेतकऱ्यांच्या घरात व शेतात पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीची विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना याला जबाबदार असणाऱ्या अतिक्रमणाविरोधात त्वरित कारवाई करून दंड आकारून कारवाईचे तसेच पाण्याने खरडून गेलेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दानवेंनी दिले. गावच रक्षण करणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, त्यामुळे त्यांनी अतिक्रमणधारकांवर कारवाई न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असे निर्देश विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तहसीलदार यांना दिले.
यावेळी तहसीलदार तृप्ती कोलते, सरपंच माधुरी काळभोर,जिल्हाप्रमुख माऊली कटके, तालुकाध्यक्ष प्रशांत काळभोर, रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत काळभोर,जिल्हा महिला आघाडी संघटिका श्रद्धा कदम, तालुका प्रदेशाध्यक्ष छाया महाडिक, जिल्हा समनव्यक उर्मिला भुजबळ व स्थानिक गावकरी उपस्थित होते.
Tags:
1