Slide 1 of 1 

"खरंच युती झाली असेल तर.." राष्ट्रवादी काँग्रेसचं भाजप - मनसेला आव्हान !
भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीवर सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा आहे. मनसेच्या वतीने मुंबईतील शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, या दीपोत्सवाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उदघाटनाप्रसंगी सोबत हजेरी लावली होती.
हे तिन्ही नेते एकत्र दिसल्याने भाजप - मनसे युतीची चर्चा जोरात सुरु झाली आहे. शिवाजी पार्क येथे मनसेकडून करण्यात आलेल्या बॅनरबाजीमधून तसे संकेत सुद्धा मिळत आहेत. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी भाष्य केलं आहे. "खरंच युती झाली असेल तर तसे जाहीर करावे छुप्या पद्धतीने राजकारण करू नये.." असं आव्हान रुपाली ठोंबरे यांनी दोन्ही पक्षांना केलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे पाटील ?
"नूकताच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दिवाळीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. खरंच युती झाली असेल तर ती जगजाहीर करावी. छुप्या पद्धतीने गोष्टी होत असतात आणि नंतर आमची युती आहे किंवा नाही हे सांगण्याची वेळ येत नाही. युती असेल तर कृपया करुन ती जगजाहीर करा. नसेल तरी जगजाहीर करा. छुप्या पद्धतीने जे काही कटकारस्थान चालतात त्यामधून संभ्रम निर्माण करणे, राजकारणाचा दर्जा खालावण्यासारखे प्रकार होऊ नयेत असं आम्हाला वाटतं.."
Tags:
1
99 Views