Slide 1 of 1 

'ती' एक चूक शिवसेनेला महागात पडलीच ; आदित्य ठाकरेंची कबुली !
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते व राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात घडलेल्या सत्तासंघर्षाच्या नाट्ट्यावर आदित्य ठाकरेंनी एका कार्यक्रमात भाष्य केलं आहे. सत्ता हातात असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमदार फुटून बाहेर पडले याची पूर्वकल्पना आली नाही किंवा अंदाज बांधण्यात उद्धव ठाकरे आणि तुम्ही कमी पडलात ? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. या प्रश्नावर ठाकरेंनी मोठा खुलासा केला आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे ?
"दीड वर्षांपासूनच ठाकरे कुटुंबाला शिंदे असं काहीतरी करण्याच्या विचारात असल्याची चाहूल लागली होती, शिंदेंच्या जवळचे लोक असतील किंवा इतर माध्यमांमधून ठाकरे कुटुंबाच्या कानावर ही कुणकुण आली होती. आम्ही एकनाथ शिंदेंवर डोळे बंद करुन विश्वास ठेवला हीच आमची चूक झाली. शिंदेंच्या काही जवळचे लोक, पीए वगैरे जेलमध्ये होते की काय हे जगजाहीर आहे. पण विश्वास आपल्या माणसांवर ठेवायचा की जे येऊन सांगतात त्यांच्यावर ? हा माणूस फूटू शकतो, आमच्याबरोबर येऊ शकतो असं सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवायचा का ? कदाचित यात आमची चूक झाली.."
Tags:
1
752 Views